महाआरतीच्या गजराने कोपरगाव शहर दुमदुमले

कोपरगाव – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या येथील नया घाट येथे पोहचले. त्यांनी शरयू नदीत आरती सुरू केली, त्याच वेळी कोपरगाव शहरातील मृत्युंजय मुंजोबा, सिद्धिविनायक मंदिरांमध्ये कोपरगाव शहर शिवसेनेच्यावतीने महाआरती करण्यात आली. पहिले मंदिर फिर सरकार, या गजराने कोपरगाव शहर दुमदुमले. तासभर चाललेल्या महाआरतीने नवेचैतन्य निर्माण झाले.

यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले, मुघल आक्रमकांनी राम मंदिर उद्‌ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. तेव्हापासून तर आज पर्यंत राम मंदिर बांधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. 1990 सालापासून यास जास्त चालना मिळाली. हिंदूंच्या अस्मितेच प्रतीक असलेले राम मंदिर हे बांधलेच गेले पाहिजे. राम मंदिरासाठी हिंदूंनी भाजपाला बहुमत दिले. पण साडेचार वर्षांत हा मुद्दा मागे पडला म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यास चालना देण्यासाठी चलो आयोध्येचा नारा दिला. या लढ्यात शिवसेना उतरल्याने आता त्या ठिकाणी मंदिर होणार असल्याची खात्री नागरिकांना आली आहे. राम मंदिर बांधण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळावी, यासाठी आम्ही ही महाआरती केल्याचेही त्यांनी सांगितले.

-Ads-

यावेळी पत्रकार राजेंद्र सालकर, नगर उत्तर महिला उपजिल्हाप्रमुख नगरसेविका सपना मोरे, उपतालुकाप्रमुख सलीम पठाण, रिक्षा सेना अध्यक्ष पोपट झुरळे, टॅक्‍सी सेना अध्यक्ष श्रीपाद भसाळे, शहरप्रमुख राखी विसपुते, सारिका कुहिरे, दीपाली अरगडे, सविता साळवे, अश्विनी होणे, वैशाली डोखे, सुनीता कानडे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदर दडियाला, लक्ष्मण मंजूळ, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, योगेश मोरे, विक्रांत झावरे, राहुल देशपांडे, विभागप्रमुख गोपाळ वैरागळ, रफिक मामू, मोहन आढाव, विकास शर्मा, अक्षय ननवरे, चंद्रशेखर आढाव, वसंत ठोंबरे, अंकुश आढाव, वाल्मीक चिने, आकाश कानडे आदीसह शिवसैनीक व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)