शहरातील निराधारांना आता घरपोच आहार

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांचा उपक्रम

कोपरगाव – सामजिक बांधिलकीतून कोपरगाव शहरातील आबालवृद्ध, निराधार, अपंग नागरिकांना दररोज मोफत सकस भोजन आहार घरपोच दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली. कोयटे हे सतत प्रयोगशील विविध उपक्रम राबवीत असतात. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या मनात ही कल्पना घोळवत होती.

कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन व राज्यात अग्रेसर असलेल्या समता पतसंस्थेच्या संयुक्‍त विद्यमाने आता हा प्रायोगिक तत्वावर सामाजिक उपक्रम सुरु केला जाणार असून पहिल्या 50 नागरिकांना मोफत सकस भोजन आहार डब्याद्वारे घरपोहाच केला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी प्राथमिक स्तरावर अर्ज मागवले असून जे खरोखर निराधार आहेत.

त्यांच्याकडून प्रतिज्ञा पत्र तसेच सामाजिक कार्यकर्त्याची ओळख घेणार आहे. ज्यांची आज खरोखर खाण्याची आबाळ होत आहे. अशा व्यक्‍तींना प्राधान्य दिले जाणार असून ज्यांना मुले काही कारणास्तव पोसू शकत नाही. अथवा काही वृद्ध निराधार तर काही ना आरोग्याच्या समस्येमुळे काम करणे शक्‍य होत नाही. अशासाठी हि योजना आम्ही अमलात आणत आहोत. भिक मागणाऱ्या व्यक्‍तींना आम्ही मदत करणार नाही.

मात्र एखाद्या व्यक्‍तीने भिक मागणे सोडून देण्याचे काबुल केले तर त्यास निश्‍चित मदत करून सकस आहार देणार असल्याचे तालुका मर्चंट असोसिएशचे अध्यक्ष मोहन झंवर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)