बोंडअळीग्रस्तांच्या खात्यावर पावणेतीन कोटी होणार जमा

file photo

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यात बोंडअळीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके हातची गेली. या पिकांचे पंचनामे शासनाकडून करण्यात आले होते. मात्र अनुदान अद्याप मिळालेले नव्हते. युवानेते आशुतोष काळे यांनी अनुदानासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाकडून दोन कोटी 75 लाख रुपयांचे अनुदान लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले जाणार आहे.

कोपरगाव तालुक्‍याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते काळे यांनी शेतकऱ्यांसह कोपरगाव तहसील कार्यालया समोर उपोषण केले होते. कोपरगाव तालुक्‍याला दुष्काळाच्या यादीत सामावेश करावा, या प्रमुख मागणीसह भारनियमन वेळापत्रकात बदल करावा, बोंडअळी बाधित व रब्बी पिके हातची गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे कोपरगाव तालुक्‍याच्या दुष्काळाच्या वस्तुस्थितीचा अहवाल पाठविला होता.तसेच दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान, तलावाच्या कामासाठी 14 व्या वित्त आयोगातून पैसे मंजूर करण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रशासनाने लेखी आश्‍वासन दिल्याप्रमाणे दिवाळीपूर्वीच दोन कोटी अनुदान जमा होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी काळे यांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)