भोंदूबाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

कोपरगाव – तालुक्‍यातील मुर्शतपूर म्हसोबानगर येथील शिवा प्रकाश भालेराव या भोंदू बाबाला कोपरगाव शहर पोलिसांनी गजाआड केले. त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवा भालेराव हा मुर्शतपूर येथील दावल मलिक दर्गा येथे भाविकांना अंगारे-धुपारे करीत असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना उद्धव अशोक काळापहाड (रा. नगर) यांनी दिली. त्यानुसार गुरुवारी (दि.27) पोलीस भालेराव राहात असलेल्या ठिकाणी गेले. तेथे नागरिकांची मोठी गर्दी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भालेराव नागरिकांना लिंबू, गंडा-दोरे, धूप-अंगारा देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी भालेराव यास ताब्यात घेतले. काळापहाड यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भालेराव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.28) दुपारी भालेराव यास कोपरगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भालेराव याच्याशी तक्रारदार काळापहाड यांची बहिणीच्या अंगात वारे येत असल्याने ओळख झाली होती. त्यानंतर काळापहाड यांच्या मेहुण्याच्या पोटात दुखत असल्याने ते भालेरावकडे उपचारासाठी येत. मात्र पती-पत्नीत भालेराव याने भांडणे लावल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर काळापहाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

कोपरगाव, मुर्शतपूर भागात अनेक बाबा

कोपरगाव व मुर्शतपूर भागात अनेक भोंदू बाबा आहेत. ते भोळ्या भाविकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांची लूट करतात. कोणी पत्रिका, कुंडली सांगून दिशाभूल करीत आहेत. चमत्कारांचे दाखले देत अंधश्रद्धेचा बाजार सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासन कधी लक्ष देणार, अशा भोंदू बाबांना कधी गजाआड करणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)