रांजणगाव देशमुखला स्वतंत्र महसूल मंडल करावे- आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव – तालुक्‍यातील पोहेगाव सर्कलमध्ये बागायती गावांचा समावेश असल्याने सतत जिरायती असलेल्या भागास शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे रांजणगाव देशमुख सर्कल नव्याने करावे, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली रांजणगाव देशमुख परिसरातील 11 गावांच्या शेतकरी शिष्टमंडळाने महसूलमंत्री पाटील यांची मुंबई हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळांत माजी सरपंच कैलास राहणे, विक्रम पाचोरे, नानासाहेब गव्हाणे, रामदास राहणे, सरपंच संदीप रणधीर, विलास डांगे, रावसाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे, नानासाहेब वर्पे, बाळासाहेब थोरात अदि शेतकरी उपस्थित होते.

-Ads-

आमदार कोल्हे म्हणाल्या, पोहेगाव मंडळातील रांजणगाव देशमुखसह 11 गावे सततची जिरायती आहेत. त्यामुळे या गावांची पीक पैसेवारी नेहमीच 40 ते 45 पैसे असते. मात्र बागायती मंडळात याचा समावेश असल्याने या भागावर सातत्याने अन्याय होतो. पोहेगाव मंडळापासून 12 किलोमीटर अंतरावर ही गावे असल्याने या भागातील शेतकऱ्यांना पायपीट करत पोहेगाव येथे ये-जा करावी लागते. मात्र शासकीय अधिकारी वेळेवर हजर राहात नसल्याने त्यांना हेलपाटा पडतो. या बारा गावांत पाटपाण्याच्या कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. पाऊस देखील अत्यल्प होतो.

कैलास राहणे म्हणाले, रांजणगांव देशमुख, जवळके, अंजनापूर, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी, वेस, सोयेगाव, धोंडेवाडी, बहादराबाद, बहादरपूर व शहापूर ही बारा गावे दुष्काळी आहेत. इतर गावांना मात्र पाटपाणी मिळते. त्यामुळे या जिरायती गावांना बागायतीमध्ये गणले जाते. त्यामुळे येथील शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे राजणगाव देशमुख सर्कल निर्माण करावे व या गावांना विविध योजनांचा लाभ द्यावा. याप्रसंगी महसूलचे सचिव जाधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)