कोपरगाव तालुक्‍यात मतदार नोंदणी मोहीम

मतदार यादीतील नाव, फोटोसह इतर दुरुस्त्याही होणार

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा नावनोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये नविन मतदार नोंदणी, नाव, फोटो, इतर दुरुस्त्याही केल्या जाणार आहेत, अशी माहिती तहसीलदार किशोर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. कदम म्हणाले की, विधानसभा मतदार संघातील नविन मतदारांनी 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. ही मोहिम 1 सप्टेंबरपासून सुरू आहे.

नावातील दुरूस्ती, स्थलांतरीत नावे समाविष्ट, नविन नाव नोंदणी करणे, आदी सर्व प्रक्रिया 31 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नविन प्रारूप मतदार यादी पुर्ननिरीक्षणासाठी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करावी. यादीत नाव नसल्यास फॉर्म नमुना -6, मतदार यादीत दुरूस्ती असल्यास फॉर्म नमुना 8, तर कुटूंबातील मृत व्यक्‍तीचे नाव वगळण्यासाठी मृत्यूच्या दाखल्यासह फॉर्म नमुना 7 भरून तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रात जमा करावी. यादीत फोटो नसलेल्यांनी एक फोटो कॉपी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

उपविभागीय अधिकारी हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तर तहसीलदार सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याचे कदम यांनी सांगितले. या वेळी निवडणूक शाखेचे एम. डी. बागूल उपस्थित होते.

मतदार मदत केंद्र…

तहसील कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी मतदार मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यासाठी 31 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. दावे हरकती निकालात काढण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत तर संकलित माहिती अद्यावतीकरण 3 जानेवारी 2019 पर्यंत केले जाणार आहे. अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019 ला प्रसिद्ध होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)