वाईट कृत्यापासून परावृत्त व्हा, चांगले जीवन जगा

कोपरगाव : विधी साक्षरता शिबिरांतर्गत कैद्यांना समुपदेशन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायाधीश नामदेव मंगले.

न्यायाधीश मंगले : विधी साक्षरता शिबिरांतर्गत कैद्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम

कोपरगाव  – आपल्या हातून जे काही कृत्य घडले, त्या कृत्याच्या संबंधित निकालाला बांधील राहायला हवे. जे कृत्य केले त्यापासून परावृत्त होवून चांगले जीवन जगावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश नामदेव मंगले यांनी केले. विधी सेवा समितीच्या वतीने विधी साक्षरता शिबिरांतर्गत कैद्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम दुय्यम कारागृहात घेण्यात आला. त्यावेळी न्यायाधीश मंगले बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल भागवत, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे न्यायाधीश आनंद मोहिते, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे न्यायाधीश रोहिनी भोसले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दत्तप्रसाद कासाट, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रसाद देशपांडे आदी उपस्थित होते.

सरकारी वकील अशोक टुपेक यांनी मनुष्याचा मूळ गुणधर्म सुखदायी व आनंददायी ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. सरकारी वकील शरद गुजर यांनी व्यसनमुक्‍ती आणि कायद्याचा आधार घेवून चांगल्या वर्तणुकीचा प्रयत्न ठेवल्यास शिक्षेस फायदा होवू शकतो, असे सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरकारी वकील बाबासाहेब पानगव्हाणे, गटविकास अधिकारी कपीलनाथ कलोडे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, सहायक फौजदार बाबासाहेब शिदें, पो.कॉ. रशिद शेख, अमोल डोखे, सचिन शेवाळे, आदींनी परिश्रम घेतले. निवासी नायब तहसीलदार शिवाजीराव सुसरे यांनी स्वागत केले. माजी सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी प्रास्ताविक, सुशांत घोडके यांनी सूत्रसंचालन, तरुंग अधिकारी रवींद्र देशमुख यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)