धोकादायक काटवन भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले स्वच्छ

कोपरगाव – कोपरगाव शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड रस्त्यावरील धोकादायक वळणावरील काट्याच्या कुपनामुळे अपघात झाले. त्यात अनेक जणांचा बळी गेले. साईधाम कमान परिसर सर्वाधिक धोकादायक झाला. रविवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी “स्वच्छ भारत अभियान’ राबविले. रहदारीला अडथळा येत असलेले काटवन तोडून स्वच्छता केली.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे हे स्वतः या अभियानात सामील झाले होते. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, बाळासाहेब नरोडे,दादासाहेब नाईकवाडे, गोपीनाथ सोनवणे, जगदीश मोरे, संजय पवार, जंगू मरसाळे, पंडित पंडोरे यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी हातात विळा, कुऱ्हाड, खोरे, कुदळ घेऊन स्वच्छता केली. रस्त्यावर आलेले काटवण तोडून अपघाताचा धोका कमी केला. या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

हाताची घडी तोंडावर बोट याप्रमाणे ते शांत बसून अपघाताची मालिका पाहत आहेत. रहदारीला अडथळा ठरणारे आणि अपघाताला निमंत्रण देणारे काटवन, झुडपी तोडून स्वच्छ करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची वाट न पाहता भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून रहदारीचा अडथळा दूर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)