संग्रहित छायाचित्र

कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यातील सात्रळ येथे बिबट्याने कालवडीचा फडशा पाडला. कैलास जगन्नाथ प्रधान यांचे शेतातील वस्तीलगत असणाऱ्या गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गोठ्यालगत ते राहात असल्यामुळे नेहमीप्रमाणे पहाटे शेणकुर करण्यासाठी गेले असता, त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना माहिती दिली.

शुक्‍लेश्वर बोरुडे, संतोष कडु, जालिंदर वाघचौरे, विजय वाघचौरे, पोलीस पाटील भास्कर पलघडमल आदींनी परिसरात पाहणी केली. त्यांना शेतात बिबट्याटे ठसे आढळून आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा संचार दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शाळेत जाणारे मुलेही धास्तावले आहेत.

या घटनेनंतर येथील रहिवाशी बाबासाहेब वाघचौरे, रमेश पलघडमल यांनी वनविभागाशी संपर्क केला असता पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.शिंदे, वन कर्मचारी पठाण एम.एच. घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)