कोल्हारमध्ये सात जागांवर पोटनिवडणुकीची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र

कोल्हार खुर्द -राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास वर्ष झाले असताना काही प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेले नाही. या प्रभागात लवकरच पोटनिवडणूक लागणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या एक वर्षांपूर्वी कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यामध्ये जनसेवा मंडळ आणि ग्रामविकास मंडळ असे दोन गट समोरासमोर उभे ठाकले होते. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या कालावधीत जातपडताळणीचे प्रमाणपत्र सादर करावयाचे होते आणि ज्यांना हे शक्‍य नाही, अशांनी हे प्रमाणपत्र निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक होते; मात्र निवडून आलेल्या उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही प्रभागातील उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्रशासनाला सादर केलेच नसल्याने या उमेदवारांचे सदस्यत्व सध्या धोक्‍यात आले आहे.

गावातील वार्ड नं 1 मधून 1, वार्ड नं 2 मधून 1, वार्ड नं 3 मधून 1, वार्ड नं 4 मधून 2, वार्ड नं 5 मधून 2 अशाप्रकारे जवळपास गावातील सात उमेदवारांनी आपले जातपडताळणीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांचे पद धोक्‍यात आले आहे. अर्थात अजून अपात्रतेबाबत कुणालाही जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र आलेले नाही. पोटनिवडणूक होईल, या दृष्टिकोनातून विरोधी गट कामाला लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)