घारगावची मुले शिकताहेत पडवीत

(घारगाव ता. श्रीगोंदा) : येथील जिल्हा परिषदेची शाळा पडून वर्ष लोटले तरी अद्यापही नव्या शाळा खोल्याचे बांधकाम होईना. (छायाः योगेश चंदन, कोळगाव)

शाळाखोल्यांचा ‘झेडपी’ला विसर : ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

कोळगाव – श्रीगोंदा तालुक्‍यातील घारगाव येथील नव्याने शाळाखोल्या उभारण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला विसर पडला आहे. या खोल्यांसाठी ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळाखोल्यांसाठी मार्च महिन्यात निधी वर्ग करून तातडीने आठ खोल्या उभारण्यात येतील असे आश्‍वासन दिले होते. परंतू आत सप्टेंबर उजाडला तरी अद्यापही शाळा खोल्यांचा विषय जैसे थेच असल्याने ग्रामस्थांनी आता पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारतीचे बांधकाम मागील वर्षी पावसाळ्यात पडले. याबाबत शिक्षण विभागाकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी शाळा खोल्या बांधण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही म्हणून गावातील पालकांनी 26 जानेवारी 2018 रोजी आत्मदहनचा निर्णय घेतला. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याशी चर्चा करून 8 शाळा खोल्या बांधण्यासाठी मार्च 2018 पर्यंत निधी वर्ग करून कामास सुरवात होईल, असे लेखी आश्‍वासन देऊन हे आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. मात्र अद्यापपर्यंत शाळाखोल्या बांधण्यासाठीचा निधी वर्ग झाला नाही म्हणून घारगाव येथील ग्रामस्थ व पालक पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर आहेत.

निविदा प्रक्रिया जिल्हा परिषदस्तरावर चालू आहे. या काळात काही दुर्घटना झाली तर यासाठी वरिष्ठ अधिकारी व आम्ही सर्व जण जबाबदार आहोत.
– गुलाब सय्यद ,गटशिक्षणाधिकारी

वेळोवेळी पाठपुरवठा करूनही काहीच झाले नाही. 8 दिवसांपूर्वी शाळेत नाग निघाला होता. भविष्यात जर काही दुर्घटना झाली तर यासाठी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी जबाबदार राहतील तसेच येत्या 15 दिवसात शाळेचे काम चालू नाही झाले तर पालक व ग्रामस्थ शाळेस कुलूप ठोकून आत्मदहन आंदोलन करणार आहोत.
– धनंजय पवार ,सामाजिक कार्यकर्ते

सध्या शाळेतील मुले हे जुन्या इमारतीच्या पडवीत बसून शिक्षण घेत आहेत. शाळेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेतात. प्रत्येकाला साक्षर करण्याच्या उद्देशाने सरकारकडून शिक्षणांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. स्वच्छ भारत मिशन, सर्व शिक्षा अभियान यासारख्या योजनांच्या माध्यमातून शाळांत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठीही निधी दिला जातो व लोकसहभागातून शाळांचा विकास केला जातो. मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शाळेची गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहे. सुरक्षिततेकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न असला तरी त्यांच्या सुरक्षितेकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)