महिलांनी रोजगाराभिमुख होणे ही काळाची गरज : लगड

कोळगाव – ग्रामीण भागातील महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नसून त्यांच्या अंगातील विविध कलागुणांना वाव मिळाला तर रोजगाराच्या अनेक संधींची निर्मिती होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांनी केले.
येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाच्या बॅंक लोन महिला मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, महिलासारखे उत्तम व्यवस्थापन कोणीच करू शकत नाही. त्यांच्या अंगी असलेल्या प्रामाणिकपणा व चिकाटीच्या गुणांवर त्या विविध क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी आपला न्यूनगंड बाजूला ठेवून व्यवसायाभिमुख होणे गरजेचे आहे. शासनाच्या मुद्रा योजनेचा लाभ घेऊन तसेच पंचायत समितीच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सक्षम झाल्या तरच भारत समृद्ध व विकसीत देश होऊ शकतो. महिलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे.

यावेळी कोळगाव सेंट्रल बॅंकेचे व्यवस्थापक मंजुनाथ नाईक, कर्ज व्यवस्थापक प्रशांत नवले, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर, विस्ताराधिकारी काशिनाथ सरोदे, तालुका समन्वयक विकास जाधव व विलास राठोड, वैद्यकीय अधिकारी सूनील दासरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी घुटे, पर्यवेक्षिका संगीता भालेकर, संगीता बोडे व बचत गटातील महिला यावेळी मोठ्या प्रमाणावर हजर होत्या. प्रास्ताविक तालुका समन्वयक विकास जाधव यांनी केले तर आभार विलास राठोड यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)