गांधी दाम्पत्य, परदेशी, बोराटे आणि डॉ. चिपाडे यांना दिलासा

खंडपीठाचा निर्णय :  सदस्य नसल्याने बाद अर्ज वैध

अपात्रतेची तलवार टांगतीच!

खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्यासमोर अपिलांवर सुनावणी झाली. प्रदीप परदेशी यांच्या अर्जावर पहिली सुनावणी झाली. ऍड. नितीन गवारे पाटील यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, “अनाधिकृत बांधकाम करणारा किंवा त्या जागेत राहणारा, त्या मालमत्तेचा वारसदार पालिकेचा सदस्य म्हणून अनर्ह ठरतो, असा कायदा सांगतो. मात्र संबंधित उमेदवार हे महापालिकेचे सदस्य झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावर बाधा येते.’ न्यायमूर्ती जमादार यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून परदेशी यांचा अर्ज वैध ठरविला. हाच आदेश अतिक्रमणांच्या मुद्यावर बाद केलेल्या अर्जांबाबत लागू झाला. सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी यांचेही अर्ज याच मुद्यावर वैध ठरले गेले. मात्र भाजपचे सुरेश खरपुडे यांचा अर्ज न्यायालयाने बाद केला. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यावतीने ऍड. राजेंद्र देशमुख यांनी युक्तिवाद केला.

नगर : अनाधिकृत बांधकाम करणारा किंवा त्या जागेत राहणारा, त्या मालमत्तेचा वासरदार पालिकेचा सदस्य म्हणून अनर्ह ठरतो, असे कायदा सांगतो. परंतु संबंधित उमेदवार हे अद्याप सदस्य झालेले नाहीत, या युक्तिवादावर दिप्ती गांधी, सुवेंद्र गांधी, डॉ. योगेश चिपाडे व प्रदीप परदेशी यांचा उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज वैध ठरविला.

बाळासाहेब बोराटे यांचाही अर्ज न्यायालयाने वैध ठरविला आहे. सुरेख खरपुडे यांचा अर्ज मात्र बाद केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र आणि स्नुषा दीप्ती यांच्यासह प्रदीप परदेशी व सुरेश खरपुडे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. योगेश चिपाडे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविले होते. संबंधित उमेदवारांनी खंडपीठात अपील केले होते.

अर्ज माघारी घेण्याचा दिवस देखील आजच होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. न्यायालयाने सुरेश खरपुडे वगळता इतरांच्या बाजूने निर्णय दिला. या निकालाची माहिती नगरमध्ये येताच खासदार गांधी यांच्या घरासमोर, बोराटे यांच्या माळीवाड्यात आणि डॉ. चिपाडे यांच्या बालिकाश्रम कार्यालयासमोर जोरदार जल्लोष झाला.

भारतीय जनता पक्षाचे सुवेंद्र गांधी आणि त्यांची पत्नी दीप्ती यांचा अर्ज प्रभाग क्रमांक अनुक्रमे 11 व 12 मध्ये आहेत. बांधकामांच्या अतिक्रमणांमुळे त्यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत निवाडा दिला होता. हा निकाल देताना मध्यरात्र झाली होती. त्यामुळे विशेष करून गांधी दाम्पत्याच्या निकालाची उत्सुकता वाढली होती. खंडपीठात अपील करताना या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. शनिवारी खंडपीठात अपील दाखल झाले. यावर सोमवारच्या दुपारच्या सत्रात सुनावणी झाली. या सुनावणीत चार जणांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

दरम्यान, छाननीत बाद झालेले उमेदवारी अर्ज खंडपीठाने वैध ठरविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्याची मागणी हरकतदरांनी केली होती. मात्र खंडपीठाने ती अमान्य केली. निवडणूक झाल्यावर यातील जे निवडून येतील त्यांच्या विरोधात याचिका दाखल करा, असे निर्देशही न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांनी दिले असल्याची माहिती ऍड. नितीन गवारे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)