केडगावकरांना जलवाहिनीतून दुर्गंधीयुक्‍त पाणी

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात : आंदोलनाचा इशारा

केडगाव – येथील केडगाव उपनगरातील देवी रस्त्यावरील अथर्वनगर कॉलनीत पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीतून गटारातील दुर्गंधीयुक्‍त पाणी येत असल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत महापालिकेला निवेदन देऊनही दखल न घेतल्याने मनोज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या दुर्गंधीयुक्‍त पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत कारवाई न झाल्यास येथील नागरिक पालिकेवर गुन्हे दाखल करतील. या भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन एका ठिकाणी खोदाई करताना फुटली असता या पाईपलाईनमधून काळ्या, निळ्या रंगाचे गाळमिश्रीत पाणी बाहेर पडताना आढळून आले.

त्यामुळे ही पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची आहे की गटारीची असा प्रश्‍न पडला. नागरीक वारंवार तक्रार करीत आहेत तरी पालिका प्रशासन हातावर हात देऊन बसले आहे. पालिकेने योग्य ती कारवाई करावी व नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी नितिन घोडके, सुनिल बिचकर, विजय साळी, धनंजय जोशी, दिलीप दुधावळ, सुनिल पाठक, बडवे, सुर्यवंशी आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)