पथदिव्यांचा प्रश्‍न सुटत नसल्याने उपायुक्‍तांना कंदिल भेट

केडगाव परिसरातील नागरिकांची मनपात गांधीगीरी : समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नगर – गेल्या तीन महिन्यापासून केडगाव उपनगरात सुरू असलेल्या बंद पथदिव्यांची समस्या वेळोवेळी अजित कोतकर यांनी मनपा प्रशासनाला कळवली होती. शिवाय केडगावचे तरुण नेते मनोज कोतकर यांनी देखील याबाबत वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा सुरू केला होता.परंतु नेहमीप्रमाणेच या पालिका प्रशासनाने सदरील गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत केडगावकरांचा रोष ओढावून घेतला. मात्र या परिसरातील नागरिकांनी कुठल्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेला धक्का न लावता शिवमुद्रा प्रतिष्ठान व प्रा. मनोज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज पालिकेत दुसऱ्यांदा आंदोलन केले व उपायुक्त पठारे यांना कंदील निषेध म्हणून दिला.

यावेळी मोहिनी नगर शास्त्री नगर हनुमान नगर दूध सागर विद्यानगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला पंचवीस वर्षांपासून प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा लोकप्रतिनिधींचा धाक नव्हता, शिवाय गेल्या तीन-चार वर्षांपासून नवीन नेतृत्व नगरला मिळाल्याने चांगल्या प्रकारची भावना नगरकरांमध्ये निर्माण होत आहे. परंतु प्रशासनाची मरगळ अजून गेलेली नाही असे अजित कोतकर यांनी पालिकेत निक्षून सांगितले. आज तुमच्याकडे आलेले सर्व तरुण हे उच्चशिक्षित आहेत व पुढे हेच समाजाचे नेतृत्व करणार आहेत व त्यासाठी लोकशाही मार्गाने स्वतःच्या न्याय्य मागण्या या पूर्ण करून घेणारच आहेत. आपण आमच्या मागण्यांना गेल्या महिन्याभरापासून वाटाण्याच्या अक्षता लावत आहात परंतु आज आम्ही गांधीगिरी करत आपणाला कंदील भेट देत आहोत.

आम्हाला शिवनीती सुद्धा येते व आमच्या केडगावचा गौरवशाली इतिहास सर्वांनाच माहित आहे प्रगतीसाठी आम्ही नेहमी कष्ट घेतले आहेत व यापुढेही ते घेऊ त्यामुळेच आज केडगाव उपनगर म्हणून सर्वांना परिचित आहे.आमच्या निर्माण झालेल्या समस्या या प्रशासनाने दूर केल्या नाही तर आम्ही आणखी तीव्रपणे आंदोलन पुकारून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेऊ पुढील आंदोलनाची तयारी आम्ही सुरू केली आहे. योग्यप्रकारे समाधानकारक उत्तर दिले असले तरी आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहोत असे अजित कोतकर म्हणाले.

आयुक्त हे देखील तरुण आहेत धडाडीचे आहेत व त्यांच्यावर आम्ही केडगावकर म्हणून खूप खुश आहोत. त्यांनी देखील आमच्या या बंद पथदिव्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे ही विनंती करत केडगावकरांनी पालिकेत निषेध व्यक्त केला यावेळी सोन्याबापु घेंबुड, अनिल ठुबे, भरत मतकर, भाऊ शेंडगे, योगेश होगले, तुषार चौधरी, हर्षल कोतकर, कुमार गोफणे, अभी लोखंडे, बंटी विरकर, रणजीत ठुबे, यांसह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)