सुरक्षारक्षकाच्या हत्येने केडगाव पुन्हा हादरले

कोतवाली पोसिसांकडून चौघा परप्रांतीयांना अटक : केडगावच्या संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविला

नगर  – शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांड होऊन तीन महिने झालेल्या केडगावमध्ये महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच वाचमनची हत्या झाली आहे. मनोज भाऊसाहेब अंधारे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे हत्या झालेला तरुण आहे. परप्रांतीय आठ जणांच्या टोळीने ही हत्या केली असून, यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केडगाव येथील शास्त्रीनगर भागात रहिवाशी इमारतीचे मोठे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील साहित्याच्या निगरानीसाठी मनोज अंधारे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. याच ठिकाणी काही परप्रांतीय मजूरही काम करत होते. रात्रीच्या सुमारास या परप्रांतीय कामगारांनी मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डवर गाणे वाजवित होते. धिंगाणा घालत होते. मनोज अंधारे यांनी यावरून या टोळीला हटकले. टेप रेकॉर्डचा आवाज कमी करण्यास सांगितले. या टोळीला त्याचा राग आला. काहींनी मनोज अंधारे यांच्याबरोबर वाद सुरू केले. त्यातून मारामारी सुरू झाली. अंधारे यांना धरून काहींनी चांगलीच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या टोळीतील एकाने मनोज अंधारे यांच्यावर धारदार हत्याराने वार केला.

जखमी झालेले अंधारे जमिनीवर कोसळले होते. तरी देखील ही परप्रांतीय टोळी त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत होती. अंधारे यांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अंधारे यांचे उपचारापूर्वी निधन झाले आहे. या हत्येची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी परप्रांतीय टोळीच्या अटकेसाठी दोन पथके तयार केली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी या टोळीतील सहा जणांना अरणगाव शिवारातून ताब्यात घेतले. पोलीस नाईक राजू सुद्रिक, राहुल द्वारके, अरुण मोरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

या हत्येमुळे केडगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या कोणत्याही राजकीय वैमनस्यातून झाली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीमुळे संवेदनशील केडगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात किरकोळ वादातून ही हत्या झाल्यामुळे पोलिसांनी केडगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)