पावसाअभावी चारापिके घेण्याची वेळ

File photo

भीमा-घोडनदी पात्र पडले कोरडे; घोड धरणातील उपलब्ध पाण्यावरच भवितव्य

फळबागा जगविण्याचा ज्वलंत प्रश्‍न

एकेकाळी श्रीगोंदे तालुक्‍यातील लिंबू फळबागातून देश-परदेशात लिंबू विक्रीसाठी पाठविले जात होते. लिंबू, डाळिंब, द्राक्षे, व इतर फळबागा पाण्याअभावी जगविण्याची चिंता शेतकरी वर्गाला भेडसावत आहे. गव्हू-हरभरा पिकाला पाणीप्रश्न भेडसावण्याचे भीतीने शेतकरी जनावरांचे चारापीक कडवळ-मका घेण्याकडे शेतकरी वळलेला दिसतो. यंदाच्या दुष्काळात शेतीपिके, जनावरांचा चाराप्रश्न व पिण्याचे पाणी याचे नियोजन काळाची गरज आहे. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

काष्टी – श्रीगोंदे तालुक्‍यातील काष्टी भागातील दहा-पंधरा गावांना घोडनदी व भीमानदीच्या पट्ट्यात नगदी पीक म्हणून ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. श्रीगोंदे तालुक्‍यात दरवर्षी सरासरी सुमारे 30 ते 35 लाख मेट्रीकटन ऊस उत्पादन होते, त्यापैकी सुमारे 50 टक्के ऊसउत्पादन काष्टी भागात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र यंदा पावसाअभावी भीमा नदी-घोड नदीपात्र कोरडे पडले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्याने शेतकरी ऊसपीकाऐवजी जनावरांसाठी चारापीके कडवळ-मका करण्याकडे वळला आहे.

श्रीगोंदे तालुक्‍यातील साखर कारखान्यांसह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊसपुरवठा काष्टी भागातून केला जातो. बारमाही बागायतीक्षेत्र असल्याने राज्यात उसाचे आगार म्हणून, श्रीगोंदे तालुक्‍यातील काष्टी भागातील नदीपट्ट्यातील दहा-पंधरा गावांचा नावलौकीक आहे. श्रीगोंदे तालुका कुकडी व घोड धरणाचे लाभक्षेत्रात येते. कुकडी-घोड धरणाचे पाण्याने श्रीगोंदे शेती ओलीताखाली आल्याने बागायती भाग म्हणून राज्यात ओळखला जातो. श्रीगोंदे तालुक्‍यातील साखर कारखान्यांना ऊसगाळपासाठी प्राधान्याने दिला जातो.

हुमणी अळीने ऊसपिके जळून गेली. जनावरांना चारा म्हणून ऊस तोडला. यंदाच श्रीगोंदे तालुक्‍यातील साखर कारखान्यांना गाळपहंगामासाठी ऊसटंचाई जाणवणार आहे. यंदा आडसाली ऊसलागवड झाली नाही. संभाव्य पाणीटंचाई व हुमणी आळीचा प्रादुर्भावाने शेतकरी खोडवा पीक राखणार नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी ऊसाअभावी साखर कारखाने गळीत हंगामाचे काळजीने चिंतातूर बनले आहेत.

दसरा-दिवाळी सण आला परंतू पावसाअभावी बाजारपेठेत शुकशुकाट जाणवतो. सध्या भीमानदी व घोडनदी पात्र कोरडे पडले आहे. घोड धरणातील उपलब्ध पाण्यावरच भवितव्य ठरणार. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. जनावरांचे छावण्या व पिण्याचे पाण्याचे टॅंकरची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)