चारित्र्यवान माणसाची जीवनचरित्रे प्रेरणादायी – गिरी महाराज

काष्टीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाची सांगता

काष्टी – जगात मानवता व माणूसकी सर्वश्रेष्ठ आहे. चारित्र्यवान माणसाची जीवनचरित्रे समाजाला प्रेरणादायी ठरतात. अखंड हरिनाम सप्ताहाची परिपूर्णता काल्याचे किर्तनाने होते, असे प्रतिपादन पांडुरंग महाराज गिरी यांनी काष्टी येथे बोलताना केले. काष्टीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाची सांगता पांडुरंग गिरी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने झाली.

श्रीगोंदे (नागवडे) साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व सहकारमहर्षी काष्टी सोसायटीचे मार्गदर्शक संचालक ज्येष्टनेते भगवानराव पाचपुते यांचे पुढाकाराने काष्टीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचे जन्मोत्सव व महाभिषेकानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे भैरवनाथ मंदिरात आयोजन करण्यात आले होते.

हरिनाम सप्ताहाचे सांगता समारंभास ज्येष्ट नेते भगवान पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, माजी सभापती अरुण पाचपुते, रत्नमाला पाचपुते, ऍड. प्रताप पाचपुते, माणिक पाचपुते, काष्टी सोसायटीचे अध्यक्ष ऍड. विठ्ठल काकडे, उपाध्यक्ष भैरवनाथ कोकाटे, मॅनेजर जालिंदर पाचपुते, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दीपक भोसले, डॉ. राम पाचपुते, बबनराव मदने, कृष्णा महाराज गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. भैरवनाथ कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विठ्ठल काकडे यांनी प्रास्ताविकात हरिनाम सप्ताहाचे आयोजनाची सविस्तर माहिती दिली.

यावेळी उपस्थित किर्तनकार, प्रवचनकार, अध्यात्मातील नामवंताचा भगवान पाचपुते व सदाशिव पाचपुते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काष्टी सोसायटीचे सर्व संचालकमंडळ, काष्टी ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथ राहिंज, युवानेते सुनील पाचपुते, बाळाप्पा राहिंज, काशिनाथ काळे, भानुदास दातीर, अविनाश साळुंखे, आशिम शेख, गुलाब शेख, दत्ता महाराज शिपलकर आदिंसह काष्टीकर ग्रामस्थ उपस्थित होते. सप्ताहादरम्यान माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी भेट देवुन शुभेच्छा दिल्या.

सप्ताहादरम्यान किर्तनकार बाळकृष्ण दळवी, ज्ञानेश्वर रासकर, गुलाबराव करंजुले, नंदकुमार पवार, मनोहर सिनारे, कैलास केंजळे, डॉ. सुहास फडतरे, पाडुरंग महाराज गिरी आदिंची कीर्तने झाली. व्यासपीठ चालक महादेव पालकर व सुलाखे महाराज होते.

दरम्यान हरिनाम सप्ताहाचे यशस्वीतेसाठी भगवान पाचपुते यांचे मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष भास्कर जगताप, उपाध्यक्ष मोहन भोसले, भैरवनाथ कोकाटे, यशवंत शेजूळ, रमेश पाचपुते, अशोक भोसले, कैलास पाचपुते, बापूराव कोकाटे, पोपट कोकाटे, विजय कुलकर्णी, राहुल साळवे आदिंसह काष्टीकर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. काल्याचे कीर्तनानंतर भगवानराव पाचपुते मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. प्रताप पाचपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)