काष्टीत रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन

श्रीगोंदे – तालुक्‍यातील काष्टी येथे जगद्‌गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामचे नरेंद्राचार्य महाराज यांचे उद्या सकाळी दहा वाजता प्रवचन व दर्शन सोहळा आयोजीत करण्यात आला असुन, तालुक्‍यासह राज्याच्या विविध भागातून महाराजाचे भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्राचार्य महाराज मंडळाच्यावतीने सामाजिक कार्य करण्यात येत असून, शेतकरी वर्गाला मदत, गरजूंना मदत, शिक्षण, देहदान संकल्प आदी कार्यक्रमाबरोबर मन अध्यात्मिकवादी, बुद्धी वास्तववादी ठेवा शांती, सुख, समाधान स्थेर्य, प्रगती साधण्याचा मार्ग दाखवणारे अंधश्रध्दा संपवत समाजजागृती करत धर्माचा पाया भक्कम करणारे स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळ्याचे काष्टी येथे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-

गुरुपूजन, आरती सोहळा, साधक दिक्षा असे कार्यक्रम होणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता नगर-दौंड मार्गालगत राजयोग मंगल कार्यालयासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नगर येथील जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ यांच्यावतीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)