हुमणी अळीग्रस्त उसाचे पंचनामे करा

संग्रहित छायाचित्र

सुनील पाचपुते : राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी

काष्टी – श्रीगोंदे तालुक्‍यात निम्मा सप्टेंबर महिना संपला तरी पाऊस नाही. पावसाळ्याचे साडेतीन महिने कोरडे गेले.उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने जगविलेला ऊस भर पावसाळ्यात हुमणी अळीने बेचिराख केला आहे. हुमणी अळीग्रस्त ऊस जनावरांचे चारा म्हणूनही उपयोगात येत नाही. ऊस लागवड व संगोपन यासाठी कर्ज काढून शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केलेले आहेत. हुमणी आळीचा प्रादूर्भाव ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे राज्य सरकारने हुमणी अळीग्रस्त उसाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाचपुते यांनी केली.

यासंदर्भात पाचपुते म्हणाले की, गेल्या वर्षी तालुक्‍यात चांगला पाऊस झाला होता. धरणे भरली होती. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली होती. उन्हाळ्यात पीके जगली. यंदा अतिरिक्‍त ऊस गाळपाचा प्रश्‍न भेडसावण्याची भीती शेतकरी व्यक्‍त करीत होता. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर शेतकरी आशावादी होता. पण नंतरच्या काळात पाऊस गायब झाला. शेतकरी हवालदिल झाला. शेतीमाला कवडीमोल भाव मिळतो.वेगवेगळ्या पिकांवर रोगांचा उपद्रव झाला आहे.

उसासारख्या एकमेव नगदी पिकावर पांढरा मावा व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला. अचानक ऊस पांढरा-पिवळा पडून उन्मळून पडू लागला. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होईपर्यंत ऊस जगूच शकत नाही, असे चित्र आहे.
याबाबत आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेवून निवेदन देणार आहोत. तरी राज्य सरकारने हुमणी अळीग्रस्त उसाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुनील पाचपुते, शशिकांत जाधव, राहुल पाचपुते, सचिन भोर आदींनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)