कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे श्रीगोंद्यात उपोषण

पिंपळवाडी, दूरगाव भागातील शेतकऱ्यांवर अन्याय; 20 तासात आवर्तन बंद

कर्जत – तालुक्‍यातील पिंपळवाडी, दूरगाव आदी भागात कुकडीचे आवर्तन न पोहोचल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी श्रीगोंदे येथे जाऊन कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.30) दुपारी एक वाजेपासून उपोषण सुरू केले. पाणी अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा निर्णय घेतला. या प्रश्नावर निवेदन करून अभियंता कार्यालयात देण्यात आले.

येसवडी कुकडी चारीवरील पिंपळवाडी, दूरगाव या भागात जाणाऱ्या उपचारीचे पाणी अचानक बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याचा निर्णय घेत श्रीगोंद्याकडे धाव घेतली. कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी अवघ्या 20 तासातच पाणी बंद झाल्याने म्हटले आहे.

“श्रीगोंदे येथे उपोषणाला बसल्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना फोनवरून संपर्क केला. त्यांनी कुकडीचे उपअभियंता दिलीप साठे यांना यासंदर्भात सूचना करीत आहे. अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी येतील असे पालकमंत्र्यांनी माझ्यासह मुबारक मोगल यांना फोनवरून सांगितले. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत आमच्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे आम्ही उपोषणावर ठाम असून, हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय उठणार नाहीत.
– रूपचंद पोटरे,चेअरमन, सेवा सोसायटी, पिंपळवाडी

येथील शेतकऱ्यांनी एक लाख साठ हजार रुपयांची पाणीपट्टी भरली. तरीही पुरेसे पाणी देण्यात आले नाही. या भागातील शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत असून पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. जोपर्यंत आवर्तनाचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या उपोषणात पिंपळवाडी, दूरगाव, ढगे वस्ती, जानभरे वस्ती, सौताडे वस्ती आदी भागातील शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये पिंपळवाडी सेवा संस्थेचे चेअरमन रूपचंद पोटरे, सचिव राजेंद्र पोटरे, सरपंच शिवाजी चोरमले, माजी सरपंच भाऊसाहेब जंजिरे, मुबारक मोगल, डॉ. रवींद्र जंजिरे, डॉ. सुरेश पोटरे, मच्छिंद्र काळे, नवनाथ काळे, बापू कानगुडे, शरद काळे, आप्पा जंजिरे, दीपक जंजिरे, बापूराव जंजिरे, भाऊसाहेब गाडे, बबन जंजिरे, दत्ता जंजिरे, विजय पोटरे, विजय माळवदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)