पालकमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ 

File photo

कर्जत – तालुक्‍यातील माहीजळगाव पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सीना धरणाच्या हक्काच्या आवर्तनाचे पाणी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मिळवून दिले नाही. जनता दुष्काळामुळे होरपळून निघालेली असताना या भागात विकासकामांचे उद्घाटन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. येथील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत, असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

तालुक्‍यावर सतत दुष्काळाचे सावट उभे ठाकलेले आहे. मात्र सीना धरणातील आवर्तनापासून माहीजळगाव, आनंदवाडी, मलठण व परिसर वंचित राहिलेला आहे. पालकमंत्री प्रा. शिंदे यांची सर्वसामान्य शेतकऱ्याला हक्काचे पाणी देण्याची नैतिक जबाबदारी असतानादेखील त्यांनी जाणीवपूर्वक या भागातील शेतकऱ्यांना आवर्तनाच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. या भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री उद्घाटनाचे नारळ फोडत, आपल्या भाषणांमधून वाहवा मिळवत आहेत. मात्र त्यात कसलीही नैतिकता राहिलेली नाही. माहीजळगाव परिसरातील सर्व फळबागा जळून चाललेल्या आहेत.

प्रत्येक शेतकऱ्याला खासगी टॅंकरद्वारे पाण्याची वाहतूक करून, पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे फटाक्‍यांच्या आतषबाजीत स्वतःचे स्वागत करून घेत आहेत, ही अतिशय खेदाची बाब आहे. सीना धरणाचे हक्काच्या आवर्तनाचे पाणी या भागाला का मिळाले नाही? याचे उत्तर पुढील काळात पालकमंत्र्यांना द्यावे लागेल. या भागाचे लोकप्रतिनिधी आहात या गोष्टीचे भान ठेवून पाण्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे राजकारण करू नये, असा आरोपही शेवाळे यांनी पत्रकातून केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)