खेडमध्ये वाळू उपशावर कारवाई

संग्रहित छायाचित्र

कर्जत – तालुक्‍यातील खेड येथील शिवशंभोनगर भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाळू उपशावर अखेर, कर्जतच्या महसूल पथकाने रात्री कारवाई केली. या कारवाईत एक जेसीबी व तीन ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत. भीमा पात्रात महसूलच्या आशीर्वादाने, गेली कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल विभागाने अचानक कारवाई केली.

विभागाची कारवाई संबंधित वाहनावरच केली जाते. ही वाहने हमीपत्र व बॉन्ड व दंड वसूल करून सोडली जातात, मात्र वाळू उपशात सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्याचे धाडस महसूल यंत्रणा करीत नाही, हा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. कारवाईत प्रांताधिकारी अर्चना नष्टे, मंडलाधीकारी मोहसिन शेख, तलाठी विश्वास राठोड, धुळाजी केसकर आदी सहभागी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)