मराठा आरक्षण मिळाल्याने कर्जतला भाजपाचा जल्लोष

कर्जत – मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरक्षण उपसमितीचे सदस्य प्रा. राम शिंदे यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानत येथील छत्रपती चौकात भाजपच्यावतीने पेढे वाटून फटाक्‍यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

सकाळी येथील छत्रपती चौकात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे नेते, कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरवित तोंड गोड करण्यात आले. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या उत्साहाने कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी केली.

यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, रोजगार समितीचे सभापती काकासाहेब धांडे, माजी उपनगराध्यक्ष बापू नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, शहराध्यक्ष रामदास हजारे, अंगद रुपनर, स्वप्नील देसाई, नगरसेवक लालासाहेब शेळके, अनिल गदादे, सतीश पाटील, अक्षय राऊत, ज्ञानदेव लष्कर, गणेश पालवे, नितीन तोरडमल, काका ढेरे, उमेश जेवरे, बबन खळगे, संपत बावडकर, सचिन जाधव, सचिन धांडे, पप्पू नेवसे, सतीश समुद्र यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)