कर्जतच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

शिंपोरा-बाभुळगाव-खेड मार्ग झाला जीवघेणा

वर्गणीतून रस्त्यावर मुरूम…

परिसरातील ऊस या रस्त्यानेच कारखांन्याना न्यायचा असल्याने शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरता पर्याय शोधला आहे. मात्र या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष केंव्हा जाणार असा सवाल परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

कर्जत  – तालुक्‍यातील रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यातील शिंपोरा-बाभुळगाव-खेड या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे हे रस्ते जीवघेणे होत आहे. या मार्गावरून वाळुची वाहतूक होतअसल्याने रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे येथील नागरिकांची तक्रार आहे.

-Ads-

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे पाटे तुटणे, टायर फुटणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. याशिवाय या रस्त्याने मोटार सायकलीही चालवणे अतिशय जिकरीचे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेतच, शिवाय अवजड वाहतूकीमुळे रस्ताही अधिक प्रमाणात उखडला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आपले दूध, शेतीसाठी लागणारे खते व अवजारे नेता येत नसल्याने हतबल झाले असतानाच, शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी आहे. की, शेतात उभा असणारा ऊस बाहेर काढायचा कसा? शिंपोरा-बाभुळगाव व खेड रस्ता हा पुनर्वसन विभागाने बनविलेला आहे. या विभागाचे कार्यालय कर्जतला नाही. मग तक्रार तरी कोठे करायची अशी समस्या गावकऱ्यांसमोर आहे.

या रस्त्याने यापूर्वी उसाने भरलेले ट्रक, वाळूची वाहतूक, खासगी वाहने, भाजीपाल्याची वाहने, दुधाची वाहतूक करणारे टेम्पो यांची ये-जा होती, मात्र रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वाहने चालविणे अतिशय जिकरीचे व अवघड झाले आहे. वाहने पलटी होण्याची धास्ती वाटल्याने ट्रॅक्‍टर व ट्रक या रस्त्याने जा-ये करत नाहीत.

यापूर्वी ट्रॅक्‍टरट्रॉली उलटणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने येथील शेतकऱ्यांचा ऊस कारखानाही तोडण्यास तयार होईनात. म्हणून येथील शेतकरी अतिशय चिंताग्रस्त आहेत. हा रस्ता कुणाचा आहे? कोणी केलेला आहे? कोणाच्या अधिकारक्षेत्रात आहे? यापेक्षा येथील नागरिकांची अडचण व कुचंबणा लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ता तात्पुरता का होईना दुरूस्त करून देण्याची मागणी होत आहे.

तालुक्‍यातील बागायती पट्टा म्हणून खेड, बाभुळगाव, शिंपोरा हा परिचित आहे. शिंपोरा-बाभुळगाव व खेड हा कोर्टी, करमाळा, करपडी ,शिपोरा व बाभुळगाव यांना पुणे, इंदापूर व बारामती या गावांना जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे. उजनी पट्ट्यातील महत्वाचे असणारे खेड हे असल्याने व बाजारचे गाव आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी खेडला यावे लागते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)