कर्जतचे वनक्षेत्रपाल नॉट रिचेबल

शिंदे यांची विभागीय वनाधिकाऱ्यांकडे तक्रार

शासकीय वाहनाचा गैरवापर

वनक्षेत्रपाल हे त्यांना दिलेल्या शासकीय वाहनाचा गैरवापर करीत आहेत. खासगी कामासाठी या वाहनाचा सर्रासपणे वापर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कर्जत – कर्जतच्या सामाजिक वनीकरण विभागातील वनक्षेत्रपाल सिंगल हे अनेक महिन्यांपासून कार्यालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडचणी येत आहेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरच्या विभागीय वनाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कर्जत येथे कुळधरण मार्गावर सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातील प्रमुख असलेले वनक्षेत्रपाल सिंगल हे चार महिन्यांपासून कार्यालयात हजर राहत नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

वृक्षलागवड करण्याच्या काळातच अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यांचा फोन नॉटरीचेबल असल्याने कसलाही संपर्क होत नाही. तालुक्‍यात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले असतानाचा ते कागदावरच पूर्ण केले जात आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)