जिल्हा उपरूग्णलयातील रिक्तपदे न भरल्यास आंदोलन

 प्रभात प्रभाव

कर्जत- कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात रिक्‍त पदे तात्काळ भरावीत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने होत असलेली रुग्णांची हेळसांड थांबवावी अन्यथा अस्मिता ग्रुपच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा अस्मिता ग्रुपच्या संचालिका तथा जिल्हा बॅंकेच्या संचालिका मिनाक्षी सालुंके यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिला.

-Ads-

दि.18 रोजी दैनिक “प्रभात’मध्ये “कर्जतकरांचे आरोग्य व्हेंटिलेटरवर’या मथल्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. मागील अनेक महिन्यांपासून कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 11 महत्वाची पदे रिक्‍त असल्याचे रुग्णांचे हाल होत असल्याचा प्रकार दैनिक “प्रभात’ने समोर आणले. याच वृत्ताची दखल बुधवारी कर्जतच्या अस्मिता ग्रुपच्या वतीने प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्‍वर जगताप यांची भेट घेतली. यासह उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी करत चर्चा केली.

यावेळी अस्मिता ग्रुपच्यावतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात महत्वाची 11 पदे रिक्त आहेत. ते तातडीने भरण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यासह उपजिल्हा रुग्णालयात गरीब आणि गरजवंत रुग्ण लाभ घेत असुन बंद पडलेल्या सुविधा तात्काळ सुरु करण्यात याव्यात, तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात स्रीरोग तज्ञ यांची नियुक्‍ती महत्वाची असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ उपलब्ध करावे, या आशयाचे निवेदन अधिक्षक डॉ. जगताप यांना दिले. यावेळी विरोधी पक्षनेत्या पूजा मेहत्रे, नगरसेविका वृषाली पाटील, मोनाली तोटे, उषा पिसे, निर्मला खराडे, उज्वला भैलुमे आदी उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.जगताप म्हणाले की, रिक्‍तपदाबाबत वरिष्ठाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. हे निवेदन ही वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येईल. निश्‍चितच उपजिल्हा रुग्णालयात लवकरच सकारात्मक बदल करण्यात येवून उत्तम रुग्नसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)