सोनपावलांनी घरोघरी गौरींचे आगमन 

कर्जत – गणरायापाठोपाठ शनिवारी सोनपावलांनी गौरींचे मंगलमय वातावरणात, उत्साहाने स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या या सणाचा महिलांत मोठा उत्साह होता. गौरींच्या आगमनाची महिलांची जोरदार तयारी सुरू होती. गौरींसाठी सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला मग्न होत्या. नव्या साडया,अंगभर दागिने,नथ, पंचपक्वान्नांचे ताट, विविध प्रकारची मिठाई, श्रीफळ आणि विवाहित स्त्रीने भरलेली ओटी अशा थाटात गौरींचे पूजन करून घरोघरी आगमन झाले.

गौरी-गणपती, महालक्ष्मी अशा नावाने हा सण ओळखला जातो. तीन दिवस हा सण घरोघरी साजरा होणार आहे. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्‍ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन होणार आहे. काहींच्या घरी फोटोतल्या, मातीच्या मुखवट्याच्या, पितळी मुखवट्याच्या, उभ्या, पाटावर अशा पद्धतीने महालक्ष्मी बसविण्यात आल्या. प्रथेप्रमाणे पूजा करून गौरींची स्थापना करण्यात आली.

गौरींच्या सजावटीसाठी बाजारात वैविध्यपूर्ण साहित्य उपलब्ध असल्याने त्याची खरेदी करण्यात आली. या साहित्याचा सजावटीसाठी वापर करण्यात आला. दागिने, साड्या, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, फळे, फुले आदींची खरेदी करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. गौरींच्या पूजनासाठी सोळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जात असल्याने बाजारात या भाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. या तीन दिवसात सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)