कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींचे मतदान शांततेत

कर्जत – राशीन ग्रामपंचायतीसाठी आज 79.88 टक्के मतदान झाले. प्रथमच जनतेतून होत असलेल्या सरपंचपदासाठी सात, तर सतरा जागांसाठी सत्तेचाळीस उमेदवारांचे नशिब मतपेटीत बंद झाले. तसेच देशमुवाडी, तोरकडवाडी, काळेवाडी, सोनाळवाडी, परीटवाडी या पाच ग्रामपंचायतीमध्ये उत्साही व शांततेत मतदान पार पडले.

आज तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान झाले. राशीन ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांत 17 जागांसांठी 47 उमेदवार आपले नशिब आजमावित होते, तर सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्याने सप्तरंगी लढत होती. गेल्या दहा दिवसांपासून प्रचार सभांची रणधुमाळी उडाली होती. आज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. उद्या (दि.25)या सर्व निकाल जाहीर होईल. निकालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मतदान संपतेवेळी राशीन जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक चव्हाण व देशमुख गटाची किरकोळ शाब्दीक चकमक उडाली. यावेळी ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. राज्य राखीव दलाची अतिरीक्त पोलीस फौज फाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी जोरदार पथसंचलन केले होते.
ग्रामपंचायत व झालेले मतदान

देशमुखवाडी-91.46, तोरकडवाडी-94.80, काळेवाडी-90, सोनाळवाडी-91.35, पराटवाडी-85.22. कानगुडवाडीत निवडणूक बिनविरोध झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)