वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. बागल, पोटरे उपाध्यक्ष 

कर्जत – तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड.बाळासाहेब बागल यांची तर उपाध्यक्षपदी अँड. सुरेश पोटरे यांची फेरनिवड करण्यात आली. वकील संघाची निवड दरवर्षी होत असते.

या वर्षीही 15 ऑगस्टला निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतू कर्जतला जिल्हा न्यायालय व्हावे, यासाठी औरंगाबाद हायकोर्ट येथे याचिका दाखल करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या याचीकेची सर्व जबाबदारी या समितीकडे असल्याने जुनीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली. या संघाची इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सचिव ऍड. जालींदर अनभुले, वाचनालय सचिव अँड. विनोद शिंगटे, खजिनदारपदी अँड. बाळासाहेब रगडे यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)