छावण्या, टँकरसाठी रस्त्यावर उतरणार : डॉ. सुजय विखे  

कर्जत – तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची दाहकता मोठी असून, पाण्याअभावी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असून दुष्काळाबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने उपाय योजनासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावेच लागेल असा इशारा डॉ. सुजय विखे यांनी दिला. दिघी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी व शेतकरी संवादात ते बोलत होते.

तालुक्‍यातील बंद पडलेला पाणी पुरवठा योजनांच्या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. विखे यांचे लक्ष वेधले. या प्रश्नावर सकारात्मक विचार करून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या तातडीने सुरू होण्याची गरज आहे. पाण्याचे टॅंकर सुरू होण्याची तालुक्‍यात आवश्‍यकता आहे. कर्जत तालुक्‍याचे नाव दुष्काळाचे यादीत आले मात्र, त्यावर काहीच उपाययोजना होताना दिसत नाही.

सरकार शेतकऱ्यांना किती दिवस वेठीस धरणार? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, दादासाहेब सोनमाळी, सागर लाळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)