गणेश मंडळांनी परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाई

file photo

कर्जत – गणेश मंडळांनी गणपती बसविण्यासाठी पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच याबाबतचा ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा. परवानगी न घेणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गणेशोत्सव जसा जवळ येऊ लागला तसे पोलीस प्रशासन दक्ष होऊ लागलेले आहे. मोहरम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य तसेच नागरिकांसमवेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळांना नियमावली सांगण्यात आली.

गणेशोत्सवात गणेश मंडळांनी पोलीस विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र, ग्रामपंचायत, नगरपरिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र, खाजगी जागेत बसवणार असल्यास मालकाचे संमतीपत्र, विज जोडणीसाठी भरलेल्या शुल्काची पावती, वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र, ध्वनिक्षेपक वापराबाबत पोलीस स्टेशनचे परवानगी याची माहिती अपलोड करणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी स्वयंसेवकांची निवड तसेच आगमन ते विसर्जन कालावधीतील नियोजनाची माहिती पोलीस प्रशासनास देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत कर्जत शहरातील चारच गणेश मंडळांनी नोंदणी केलेली आहे.

पाच गावात एक गाव एक गणपती

कर्जत तालुक्‍यात 57 नोंदणीकृत गणपती मंडळे आहेत. तालुक्‍यातील पाच गावात एक गाव एक गणपती योजनेंतर्गत गणपती बसविले जाणार आहेत. त्यात चिलवडी, थेरगाव, थोटेवाडी, बेर्डी तरडगाव या गावांचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

“प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार गणेशोत्सवात आवाजाच्या तीव्रतेबाबत गणेश मंडळांना कळविण्यात आले आहे. गणेशोत्सवात डीजे तसेच बेंजोला परवानगी देण्यात आलेली नाही. विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओकडुन परवानगी घेण्यात यावी.पावसाच्या पाण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी गणेशोत्सवात दोन ते चार फूट उंचीचे स्टेज तयार करावे. जनावरांचा त्रास होणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी.
– राजेंद्र चव्हाण , पोलीस निरीक्षक, कर्जत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)