झेडपी शाळा खोल्यांसाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा करणार

नगरः जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्यासह सभापती पुरस्कार मिळालेले 14 शिक्षक.

ना. शिंदे : जिल्हा शिक्षक पुरस्काराचे  पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

नगर – जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधी तसेच शिक्षकांची रिक्‍त पदे भरण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण ना.शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे-पाटील होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाघचौरे, कृषी सभापती अजय फटांगरे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, प्रभावती ढाकणे, सभापती अनुसयाताई होन, बाळासाहेब लटके, व्याख्याते जितेंद्र मेटकर आदी उपस्थिती होती.

ना. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुरु असलेले उपक्रम आणि त्यासाठी येथील शिक्षक घेत असलेले प्रयत्न सर्वच ठिकाणी घेण्याची गरज आहे. चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षकांचे आहे. त्यामुळे या जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठीची त्यांची धडपड दिसून येते, असे ते म्हणाले. आता ई-लर्निंग आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा जमाना आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी झाले आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. आपला विद्यार्थी या स्पर्धात्मक युगात टिकू शकेल, असे बनविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास, मुलांसाठी आनंदनगरी, बाळमेळा अशा उपक्रम निश्चितच इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यातील शाळा खोल्यांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करु. सध्या जिल्हा नियोजन निधीतून पुनर्विनियोजन प्रस्तावातून साडेतीन कोटी, साईबाबा विश्‍वस्त संस्थानकडून तीस कोटीपैकी 10 कोटी निधी या बांधकामासाठी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष विखे म्हणाल्या, ग्रामीण भागातील शिक्षण स्तर उंचावण्यासाठी येथील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि सर्व शिक्षक कार्यरत आहेत. त्याचे फलित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत दिसून आले. शिक्षकांनी यापुढेही असेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावर्षी जाहीर करण्यात आलेले शिक्षक पुरस्कार हे गुणवत्तेने देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपाध्यक्षा राजश्री घुले, अनुराधा नागवडे यांची भाषणे झाली. यावेळी व्याख्याते मेटकर यांचे सध्याची शिक्षणपद्धती यावर व्याख्यान झाले. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे 14 शिक्षकांना तसेच एका केंद्रप्रमुखांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात पारितोषिके पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)