नगरच्या पाण्याचा जायकवाडीकडे प्रवास

संग्रहित छायाचित्र.........

मुळा, निळवंडे धरणातून अखेर सोडले पाणी : अधिकाऱ्यांचा धरणांवर तळ

नगर – एकीकडे नगर जिल्हा दुष्काळात होरपळत असताना न्यायालयाच्या आदेशाने अखेर आज (दि.1) नगरच्या पाण्याचा प्रवास जायकवाडी धरणाकडे सुरू झाला. सकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तात मुळा व निळवंडे धरणांतून नद्यांत पाणी सोडण्यात आले. यावेळी अधिकारी धरणांवर तळ ठोकून होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास सर्वांचाच विरोध होता. पाणी सोडण्यास स्थगिती मिळावी, यासाठी लाभक्षेत्रातील तालुक्‍यांत शेतकऱ्यांनी विविध आंदोलन केली. तसेच काही संस्थांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. त्यामुळे पाणी सोडण्यास काही काळ स्थिगिती मिळाली. मात्र हा आनंद क्षणभंगूर ठरला. न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी मुळा व निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले.

मुळा धरणातून सकाळी साडेनऊ वाजता मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. प्रशासनाने काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आधिपासूनच दक्षता घेतली होती. पोलीस बंदोबस्तात मुळा धरणाच्या अकरा मोऱ्यांतून सहा हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. तीन दिवसांत एकूण 1.90 टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. सकाळपासूनच अधिकारी धरण परिसरात तळ ठोकून होते.

निळवंडे धरणातून सकाळी साडेआठ वाजता प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले. प्रशासनाच्यावतीने धरण परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तहसीलदार मुकेश कांबळे, जलसंपदा विभागाचे अधिकारी व पोलीस उपअधीक्षक यावेळी उपस्थित होते. सकाळी सहा हजार क्‍युसेकने धरणातून विसर्ग सोडण्यात आला. दुपारी तो वाढवून नऊ हजार 300 एवढा वाढविण्यात आला. सुमारे तीन दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. या आवर्तनाने अकोल्यातील काही पूल पाण्याखाली गेले आहेत.

पाणी सोडण्यापूर्वी विविध तालुक्‍यांत अनेक आंदोलने झाली. मात्र पाणी सोडण्यास स्थगिती मिळणार नसल्याने सर्वांची भूमिका शेवटी तटस्त राहिली. पाणी सोडण्याच्या निर्णयाचा जिल्ह्यावर काय परिणाम होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)