जायकवाडीस पाणी सोडण्यास स्थगिती : कोल्हे

file photo

कोपरगाव – ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याने नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याची गरज पूर्ण होत नसल्याने जायकवाडीला पाणी सोडू नये, हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून, पाणी सोडण्यास दोन दिवसांची स्थगिती दिली, अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी दिली.

कोल्हे म्हणाले, सध्याची दुष्काळी परिस्थिती व तुटीचे गोदावरी खोरे असताना जायकवाडीस पाणी सोडू नये, यासाठी कोल्हे कारखान्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली होती. त्याची सुनावणी सोमवारी झाली. त्यात कारखान्याच्यावतीने विधिज्ञ संजय किशन कौल व एम. वाय. देशमुख यांनी पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच समन्यायी पाणी वाटपाबाबत शासनाने नेमलेल्या मेंढेगिरी समितीने सादर केलेल्या चौकट क्रमांक 6 प्रमाणे वरच्या धरणातील पाण्याच्या गरजा पूर्ण होत नसतील, तर पाणी सोडू नये, हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयापुढे केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांवर 2012 पासून सतत अन्याय होत आहे. गोदावरी खोरे हे तुटीचे आहे. त्याचे वाटप कधीच होत नाही. पश्‍चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवून नगर, नाशिकसह मराठवाड्याची तूट भरून काढावी, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांनी आदेश पारित केला होता.

आम्ही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी याचिका करून न्याय मागितला होता. आताही याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आमचे म्हणने ऐकूण घेऊन दोन दिवसांची स्थगिती दिली व पुन्हा याबाबत न्या. मदन लोकुर व सहकाऱ्यांपुढे शेतकऱ्यांची बाजू मांडू. त्यात परमेश्वर यश देईल, अशी खात्री असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)