जायकवाडीला पाणी सोडण्यास स्थिगिती मिळावी

संग्रहित छायाचित्र.........

हरिश्‍चंद्र फेडरेशनची न्यायालायात याचिका दाखल; प्रवरा उपखोरे पाणी संघर्ष समितीचाही पुढाकार

संगमनेर – संगमनेरसह उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निळवंडे व भंडारदरा धरणांतील पाणी वर्षभरासाठी अपुरे पडणार असून, जायकवाडीला पाणी सोडू नये, यासाठी हरिश्‍चंद्र फेडरेशन व प्रवरा उपखोरे पाणी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 चा चुकीचा अर्थ काढून जायकवाडीला पाणी नेण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वप्रथम थोरात सहकारी साखर कारखाना व हरिश्‍चंद्र फेडरेशनने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर्षी उत्तर नगर जिल्ह्यात विशेषत: संगमनेर तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झाले आहे. दिवसेंदिवस पाण्याची मागणी तीव्र होणारी आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर पशुधनही असून, ते वाचविण्यासाठी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे जायकवाडीस पाणी सोडू नये.

जायकवाडीला पाणी देऊ नये, यासाठी हरिश्‍चंद्र फेडरेशन व प्रवरा उपखोरे पाणी संघर्ष समितीने वेळोवेळी सरकारकडे मागणी केली. तसे मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला निवेदनही दिले. परंतु शासनाने वस्तुस्थिती लक्षात न घेता आडमुठे धोरण हाती घेऊन जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे हरिश्‍चंद्र फेडरेशन व प्रवरा उपखोरे पाणी संघर्ष समितीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. यावेळी पाणी संघर्ष समितीचे रोहिदास पवार (मंगळापूर), संतोष हासे (राजापूर), शंकरराव ढमक (शिबलापूर) व शेखर वाघ (खराडी) आदींनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, पाणी सोडण्यास स्थिगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)