जामखेड – नगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत जामखेड तालुक्‍यातील सहा खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून पुणे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी आपले स्थान निश्‍चित केले आहे. युवक क्रीडा सेवा संचालनालय व नगरच्या क्रीडा परिषदेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, क्रीडामार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे व जीन-सील तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हा सचिव संतोष बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव येथे या तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत, नवीन मराठी प्राथमिक शाळेची गायत्री बारगजे व आदित्य जायभाय, मिताली बारगजे (प्रवरा कन्या विद्यामंदिर) कन्या विद्यालय जामखेडच्या सानिया जाधव, करीना जाधव व माधवी आढावने सुवर्णपदक जिंकले स्वाती नन्नवरे, (ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड) हिने कास्यपदक जिंकले. विजेत्या सहा खेळाडूंची पुणे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक कुसुम चौधरी, क्रीडाशिक्षक बी. के. मडके, संतोष सरसमकर, प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्य लीलावती सरोदे, नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मीना राळेभात, संतोष बांगर, क्रीडा शिक्षक सुरज डाडर, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांचे मार्गदर्शन लाभले.

विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो तालुका संघटनेचे उपाध्यक्ष संजय बेरड यांनी प्रोत्साहन म्हणून शूज भेट देऊन सत्कार केला. या सर्व खेळाडूंचे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंढे, उपाध्यक्ष किरण बांगर, अलताफ कडकाले, शकील सय्यद, सुरेश वाघ, शंकर जेधे, दत्तात्रय उदारे, सिद्धार्थ घायतडक यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)