नगर-जामखेड रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘श्राद्ध’

चिचोंडी पाटील : राष्ट्रवादीच्या वतीने नगर-जामखेड रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले.

चिचोंडी पाटील येथे आंदोलन : बांधकाम विभागाचे लक्ष वेधणाचा प्रयत्न

नगर  – जामखेड-नगर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आंदोलन केले. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी केली. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार दुर्लक्षच केले जात असल्याने राष्ट्रवादीने प्रशासनाचा निषेध नोंदविला. अखेर रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राद्ध घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संताप व्यक्‍त केला.

-Ads-

राष्ट्रवादीचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली असे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस रामेश्‍वर काळे, युवक उपाध्यक्ष शामराव कांबळे, अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष रिजवान शेख, श्रीकांत काळे, बंडू खराडे, गणेश कांबळे, नितीन खडके, भरत कोकाटे, जयसिंग दळवी, अनिकेत जगताप, दीपक मेटे, अक्षय परकाळे, सचिन खडके, संभाजी डोखडे, संतोष कैदके, रवी दहातोंडे, दादा साठे, सुरेंद्र दहातोंडे, वैभव कोकाटे, गंगा सातपुते, महेश गवारे, विशाल हजारे, जयेश महाडीक, लाला हजारे, महादेव तनपुरे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रशासाविषयी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. नगर – जामखेड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर एक एक फूट खोल आहेत. तसेच चिंचोडी पाटील परिसरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टेच राहिले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. गतिरोधक नेमके अपघात टाळण्यासाठी आहेत का? की अपघात व्हावेत, म्हणून हेच कळत नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच याकडे दुर्लक्ष करतो.

बांधकाम विभागाला दरवर्षी किमान दोन-चार जणांचे प्राण गेल्याशिवाय जाग येत नाही. मग खड्डे बुजवले जातात. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला, या म्हणीप्रमाणे बांधकाम विभाग काम करते. त्यामुळे नगर-जामखेड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी जामखेड-नगर रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचाच श्राद्ध विधी करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)