सण उत्साहात, शांततेत साजरे करा- शर्मा

जामखेड – जनतेत प्रबोधन करणारे देखावे सादर केल्यास उत्कृष्ट देखाव्यांना पोलीस दलातर्फे विशेष पुरस्कार देण्याची घोषणा करतानाच गणेशोत्सव व मोहरममध्ये सलोखा ठेवावा, तसेच उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी, महिला व मुलींनी अडचणीत असल्याची जाणीव झाल्यास तातडीने संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.

जामखेड तालुका व शहर संवेदनशील असल्याने गणेशोत्सव व मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागातर्फे येथील पंचायत समितीच्या सभागृहमध्ये बुधवारी ( दि.12) रोजी रात्री उशिरा तालुक्‍यातील सर्व नागरिक, गणेश मंडळ, राजकीय पक्ष यांची बैठक घेण्यात आली. यावेळी दोन्ही सणांमध्ये शांतता व सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन शर्मा यांनी यावेळी केले.

तहसीलदार तथा मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर राळेभात, माजी पंचायत समिती सभापती भगवान मुरुमकर, मंगेश आजबे, शेख कल्लीमुल्ला मुसाभाई, प्रदीप टापरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पांडुरंग भोसले, डॉ. कैलास हजारे, अमोल गायकवाड, संतोष उगले, सुरेश ढवळे, आंनद गुगळे, प्रदीप टापरे, विकास राळेभात आदी यावेळी उपस्थित होते.

शर्मा पुढे म्हणाले, शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढणारे तसेच सामाजिक देखावा सादर करणाऱ्या मंडळाचा पोलीस प्रशासनाकडून पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते मंडळाचा व अध्यक्षाचा सत्कार करण्यात येईल. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. गणेश उत्सव व मोहरम शांततेत पार पाडावा असे आवाहन केले. तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, की शहरात 56 मंडळापैकी फक्त 20 जणांनीच आतापर्यंत परवानगी घेतली असुन उर्वरित मंडळाच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर परवानगी घ्यावी. विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढले असुन सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)