केंद्रीय पथकाकडून अरणगावची पाहणी

शेतकऱ्यांशी पथकातील सदस्यांनी संवाद साधत जाणून घेतली परिस्थिती

जामखेड – पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज तालुक्‍यातील अरणगाव येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

-Ads-

केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल. जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश होता. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह हेही पथकासोबत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनीही पथकाशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली.

तालुक्‍यातील अरणगाव शिवारातील महादेव श्रीरंग शिंदे या शेतकऱ्याच्या शेतास पथकाने भेट दिली. कपाशी व लिंबू पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह कृषी विभागाचे पंडित लोणारे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे शिर्डीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, सभापती सुभाष आव्हाड, तहसीलदार विशाल नाईकवाडे, कृषी अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी जगताप, बिरगळ, सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक महेश जगताप, तलाठी शेख, माजी सरपंच अजिनाथ ननावरे, नवनाथ ससाणे, उपसरपंच सोमनाथ दळवी, शिवाजी कारडे, अमोल निगुडे व अधिकारी उपस्थित होते.

पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेत दिलासा दिला. या संदर्भात केंद्र शासन निश्‍चितपणे उपायोजना करेल, अशी ग्वाही दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती, पशुधन व चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी सरपंच अंकुश शिंदे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)