जामखेडच्या चार गावांना टॅंकरद्वारे पाणी

file photo

9 हजार नागरिकांना दिलासा

जामखेड – जामखेड तालुक्‍यात पाणी टंचाई जाणवू लागली असून, तालुक्‍यातील नान्नज येथे तीन टॅंकर तर पिंपरखेड हसनबाद येथे एक टॅंकर सुरू करण्यात आला आहे तर, आठ ठिकानचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, सात ठिकाणी विहीर अधीग्रहण करण्यात आल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांची लोकसंख्या नऊ हजारांच्या आसपास आहे.

तालुक्‍यात दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. प्रशासनाकडून अधीग्रहण, टॅंकर आदी उपाययोजनांद्वारे टंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होत. जामखेड तालुक्‍यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्‍यातील भूतवडा मोहरी तलाव व खैरी प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे, परंतु हे पाणी आठ महिने पुरणार नाही, त्यामुळे यावर पर्यायी उपाय योजना करावी लागेल, तालुक्‍यातील नान्नज गावची लोकसंख्या सहा हजार आहे.

येथे प्रथमतः पाणी टंचाई जाणवू लागल्याने येथे तीन टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. दररोज दोन खेपा होणार आहेत, तर पिंपरखेड येथे एक टॅंकर सुरू करण्यात आला आहे. येथे अडीच खेपा होणार आहेत. त्याचप्रमाणे आरणगाव आघी, चोभेवाडी, राजेवाडी, सारोळा, घोडेगाव, पोतेवाडी, हाळगाव या गावचे टॅंकरचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये आले आहेत. प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून, नंतरच मंजुरी देण्यात येईल सुरू झालेले सर्व टॅंकर सातेफळ तलावातील विहीरीतून भरले जात आहे, त्याचप्रमाणे कुसडगाव, मुंजेवाडी, खांडवी, पाटोदा गावांतर्गत असणाऱ्या वाड्यातील विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)