राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये : संजीव भोर

जामखेड : मराठा संवाद रथयात्रेचे जामखेड शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.

जामखेड – शांततेच्या व शिस्तीच्या मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाने आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या. मात्र आजपर्यंत समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. आता सरकारने मराठा समाचाचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन आनखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव संजीव भोर यांनी जामखेड येथे रथयात्रेच्या स्वागता प्रसंगी केले.

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच विविध प्रश्नांसंबंधी मराठा संवाद रथयात्रेचे स्वागत जामखेड येथील सकल मराठाच्या वतीने शहरातील खर्डा चौकात स्वागत करण्यात आले. या वेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने विभागनिहाय मराठा संवाद यात्रा राज्यभर आयोजित केली आहे.

यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राम निकम, कुंडल राळेभात, पांडुरंग भोसले, धनंजय भोसले, केशव कोल्हे, सरपंच काकासाहेब चव्हाण, संतोष भोंडवे, सोमनाथ तनपुरे, संजय बेरड, तात्याराम पोकळे, शरद कार्ले, माजी सरपंच हवा सरनोबत, गजानन बेद्रे, नितीन टेकाळे, भरत पवार, गणेश पवार, जालिंदर चव्हाण उपस्थित होते.

कर्जतमार्गे जामखेड येथे आलेली ही मराठा संवाद रथयात्रा आष्टी, कडामार्गे पाथर्डीला मुक्कामी असले. दुसऱ्या दिवशी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्‍वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे येवला येथे ही यात्रा जाणार आहे. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी विधानमंडळावर ही यात्रा धडकणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)