रस्त्यावरील खडीने वाहतूकीस अडथळा

जामखेड करमाळा रस्त्यावर खडी टाकल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. (छाया- संदेश हजारे)

खडी हटविण्याची मागणी, वाहनांचे होतेय नुकसान

जवळा – तालुक्‍यातील जामखेड-करमाळा रस्त्यावरील नान्नज ते बोर्ले या गावामधील दोन किलोमीटर अंतराचे मुरुमीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी ठेकेदाराने मुख्य रस्त्यावर टाकल्याने येथे वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. ही खडी त्वरीत हटविण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

-Ads-

जामखेड-करमाळा रस्त्यावरील नान्नज ते बोर्ले या गावामधील दोन किलोमीटर अंतराचे काम सुरू असून, गेली अडीच महिन्यापुर्वी येथील ठेकेदाराने रस्त्यावर खडी टाकल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सध्या ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असुन या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रस्त्यावरील खडीचा मोठा अडथळा पार करून वाहनधारकांना आपली वाहने बाहेर काढावी लागतात. खडी टाकलेल्या दोन किलोमीटरच्या अंतरातून वाहनधारकांना आपले वाहन पार करण्यासाठी 2 ते 3 तासाचा वेळ लागतो. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

या खडीमुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, ही खडी हटविण्यासाठी संबंधीत ठेकेदाराकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही, या ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत संबंधित विभागाकडेही तक्रार करूनही त्यांनीदेखील याकडे कानाडोळा केला आहे. ठेकेदाराने रस्त्यावर समोरासमोर खडी टाकल्याने येथे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ही खड्डी त्वरीत हटविण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांकडूनही केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)