महाराष्ट्र केसरी तालुका चाचणीत 40 जणांचा सहभाग

जामखेड – महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तालुका पातळीवर घेण्यात आलेल्या चाचणी स्पर्धेत 40 पैलवानांनी सहभागी घेतला होता. माती विभागात नऊ पैलवानांची, तर मॅट विभागात सहा, कुमार गटात नऊ, अशा एकूण पंधरा पैलवानांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

तालुक्‍यातील आदर्शगाव सारोळा येथे तालुकास्तरावरील स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत चाळीस पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धा उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धा विजेता राहुल आवारे याचे वडील बाळासाहेब आवारे, आदम शेख, बालाजी जरे, श्रीधर मुळे, बाबा महारनवर, राजू शेख, कान्हूभाऊ साळुंके यांच्यासह कुस्तीपटू मोहन कांबळे, राहुल कांबळे, महंमद शेख, मोहन पवार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,सोहेल पठाण, जामीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

माती विभागात 61 किलो वजन गटात संजय तनपुरे (जामखेड), 65 किलो वजन गटात संकेत हजारे (जवळा), 70 किलो वजन गटात अरुण लोखंडे (जामखेड), 74 किलो वजन गटात कुलदीप महारनवर (जामखेड), 79 किलो वजन गटात आदिक दाताळ (बाळगव्हाण), 86 किलो वजन गटात सागर जिवडे (झिक्री), 92 किलो वजन गटात विकास तनपुरे (शिऊर), 96 किलो वजन गटात प्रमोद गायकवाड (जामखेड), 125 किलो वजन गटात सागर मोहळकर (जामखेड) यांची निवड करण्यात आली.

मॅट विभागात 57 किलो वजन गटात बाबा गायकवाड (जामखेड), 65 किलो वजन गटात संदीप हजारे (जामखेड), 70 किलो वजन गटात संभाजी दाताळ (बाळगव्हाण), 74 किलो वजन गटात अजय चव्हाण (जामखेड), 86 किलो वजन गटात अमीर पठाण (झिक्री), 92 किलो वजन गटात धनराज पवार (जामखेड) यांची निवड करण्यात आली आहे.

कुमार गटात 45 किलो वजन गटात करण आवारे (माळेवाडी), 48 किलो वजन गटात आकाश शिंदे, 51 किलो वजन गटात पवण गाडे, 55 किलो वजन गटात अशोक गायकवाड, 60 किलो वजन गटात संजय तनपुरे, 65 किलो वजन गटात उमेश शिंदे (दिघोळ), 71 किलो वजन गटात सौरभ गाडे (शिऊर), 80 किलो वजन गटात गोविंद बेडके (दिघोळ), 92 किलो वजन गटात रोहित आव्हाड (जवळा) असे एकूण पंधरा स्पर्धक नगर येथे सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत या स्पर्धेत पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच प्रा. संभाजी निकाळजे, प्रा. तोरडमल यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)