राष्ट्रीय राखीव दलाचे जवान काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार

जामखेड – तालुक्‍यातील राजुरी येथील रहिवासी व पुणे येथे सीआरपीएफमधील जवान योगेश गौतम काळदाते (वय 32) यांचे आजाराने निधन झाले असून, राजुरी गावात शोककळा पसरली आहे. आज सकाळी साडेदहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत झालेले जवान योगेश काळदाते हे 13 वर्षांपासून सीआरपीएफ या सैन्यदलात होते. सध्या ते पुणे कॅम्पमध्ये नोकरीला होते. श्रीनगर, दिल्ली व पुणे येथे नोकरी केली. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती जास्त खलावत गेल्याने अखेर त्यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यातील रूग्णालयामध्ये निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रविवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या राजुरी गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, मंगेश आजबे, सरपंच गणेश कोल्हे, डॉ. तानाजी राळेभात, सागर कोल्हे, पोपट पिसाळ, आपत्कालीन व्यवस्थापनचे मेजर डी. ई. सोनफुले, आर.एम. गोरे, संदिप धेंडे, भरत पवार, राजू गोरे, बाळासाहेब फंदाडे, सुभाष शिंदे, रामा गोरे, बाळासाहेब भोंडवे, वैभव चव्हाण व संजय होलेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)