रानडुक्कराच्या हल्ल्यात साकतला शेतकरी जखमी

साकत व परिसरात रानडुक्करांच्या उपद्रवाने ग्रामस्थ त्रस्त

जामखेड – तालुक्‍यातील साकत येथे रानडुकरांच्या हल्ल्यात प्रल्हाद वराट (वय 50 वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमीवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साकत व परिसरात रानडुक्करांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त आहेत. परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. रानडुकरे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. आता तर थेट जीवघेणा हल्ला करीत आहेत.

वराट हे रविवारी आपली गुरे चारण्यासाठी शेतात गेले असता साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका जाळीतून दहा ते पंधरा डुकरांचा कळप उठला व माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मांडीला व हनुवटीवर मोठ्या प्रमाणावर जखम झाली आहे. मी रक्तबंबाळ होऊन चक्कर येऊन पडले. शेजारी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे रानडुकरांनी तेथून पळाले. मला ताबडतोब जवळच्या लोकांनी जामखेड येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दोन महिन्यांपूर्वी सोजरबाई वराट यांच्यावर साकत येथे रानडुक्करांनी हल्ला केला होता. त्यात त्यांचा खुबा मोडला होता. त्या अद्यापही जाग्यावरच पडून आहेत. परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. यातच या रानडुक्करांच्या जीवघेण्या हल्ल्‌यामुळे भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रानडुक्करांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)