विजेच्या धक्क्‌याने कामगाराचा मृत्यू

file photo

पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून हुलगुंडे कुटुंबीयांचे सांत्वन

जामखेड – तालुक्‍यातील चुंभळी येथील मुळचे रहिवाशी असलेले मात्र सध्या नालासोपारा (पालघर) येथे महावितरणमध्ये कार्यरत असलेले वायरमन नानासाहेब शहाजी हुलगुंडे यांचा विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विद्युतप्रवाह सुरू झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पालकमंत्री राम शिंदे यांनी चुंबळी येथे जात, हुलगुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. जामखेड तालुक्‍यातील चुंबळी येथील रहिवाशी असलेले व सध्या नालासोपारा येथे महावितरण विभागात वायरमन नानासाहेब शहाजी हुलगुंडे हे गुरूवारी (दि.25) नालासोपारा येथील निळेगाव 2 येथे कामानिमित्त विजेच्या खांबावर काम करत असतानाच अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्याने, हुलगुंडे यांचा विजेच्या धक्क्‌याने जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चुंबळी येथे जाऊन हुलगुंडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरुमकर, सुर्यकांत मोरे, भाजप तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, उद्धव हुलगुंडे, मनोज कुलकर्णी, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, संतोष गव्हाळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)