भटक्‍या विमुक्‍तांमधील बालविवाह कमी करण्यास प्रयत्नशील- पवार

जिल्ह्यात पारधी विकास आराखडा कार्यक्रम

जामखेड – येथील पोलीस ठाणे व ग्रामीण विकास केंद्र, लोकअधिकार आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर जिल्ह्यात पारधी विकास आराखडा हा कार्यक्रम राबवत आहोत. त्याचाच भाग म्हणून तालुक्‍यातील गावांच्या शाळांमध्ये आदिवासी पारधी, भिल्ल व भटके विमुक्तांच्या मुलांचे बालविवाह व शाळाबाह्य होण्याचे लक्षणीय प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षकांना बरोबर घेऊन आदिवासी व भटके विमुक्तांच्या मुला-मुलींची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेणे व त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगणे व शाळेतच त्यांचे प्रबोधन करणे व पुढे ही मुले शाळाबाह्य होऊ नये तसेच त्यांचे बालविवाह करु नये यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील वाकी, धनेगाव, गुरेवाडी, आगी, व खांडवी या पाच गावातील पारधी समाजाच्या वस्तींवर जाऊन गुन्हेगारीमुक्त, रोजगार, स्थलांतर, अशा विविध मुद्यांवर पवार यांनी मार्गदर्शन केले. ऍड. डॉ. अरूण जाधव यांनी सांगितले की, प्रशासन आपल्यासोबत काम करण्यास तयार असून आपण आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी प्रशासनासोबत इमानदारीने राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सदरील उपक्रमाच्या माध्यमातून पुढील तीन वर्ष वेगवेगळे कृती कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र व जामखेड पोलीस ठाणे घेणार आहे. येत्या तीन वर्षात जामखेड तालुक्‍यातील किमान 100 मुली 10 वीपर्यंत व 100 मुले पदवीपर्यंत शिक्षण घेतील हे उद्दीष्ट संस्थेसमोर आहे. सध्या 5 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलामुलींची यादी तयार करुन त्यांच्याबरोबर फोकस काम करणार आहोत.

त्यासाठी विविध मुद्यांविषयी प्रबोधन करण्यात येणार असल्याचे पारधी विकास आराखड्याचे समन्वयक बापू ओहोळ यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी लोक अधिकार आंदोलनाचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, मधुकर पवार, विक्रम काळे, आलेश काळे, सुमन काळे, लोचना भोसले, हरी पवार आदिंनी गावोगावी बैठका घेण्याचे नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)