संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल सकल मराठा व हिंदू संघटनांतर्फे निषेध

जामखेड – सर्वशिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात लेखिका डॉ शुभा साठे यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व संतापजनक लिखाण केल्याबद्दल जामखेड तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल मराठा समाजासह विविध हिंदू संघटनांच्या वतीने तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच या पुस्तकाच्या लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका व सकल मराठा समाज यांच्यासह विविध हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि १२ व १३ रोजी सकाळी तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन दिले.

-Ads-

सभांजी महाराजांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारा उल्लेख आहे. सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात पान नं १८ वर वादग्रस्त व अपमान करणार मजकूर लिहिण्यात आला आहे. सदर माहिती मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर देखील प्रसारित झाली आहे. तसेच हे पुस्तक सर्व शिक्षा अभियाना मध्ये समाविष्ट केलेले आहे असे देखील समजते आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे समस्थ हिंदूचे प्रेरणा स्थान व आदर्श आहेत. महाराजांन बद्दल असे खोटे व संतापजनक लिखाण खपवून घेतले जाणार नाही. तसेच या लिखाणाचा व लेखिका डॉ शुभा साठे यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहेत. या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी व पुस्तकाला सर्व शिक्षा अभियानातून वगळण्यात यावे. लेखिका व प्रकाशकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शुक्रवार दि १२ रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले, शिवसेनाचे शहरप्रमुख संजय काशिद,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, विश्वहींदु परीषदेचे विवेक कुलकर्णी, बजरंग दलाचे आकाश पिंपळे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

तर शनिवार दि १३ रोजी देखील सकल मराठा समाज्याच्या वतीने पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, सोमनाथ तनपुरे, कुंडल राळेभात संजय बेरड अतुल पवार राम शिरगिरे धनंजय भोसले प्रकाश भोसले सुरेश पवार यांच्यासह सकल मराठाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन देऊन याा घटनेचा निषेध केला आहे.

What is your reaction?
10 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)