भारनियमन थांबवा, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चाद्वारे महावितरणला इशारा

जामखेड – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यासाठी महावितरणने हे अनियमित होत असलेले भारनियमन थांबवावे, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू, असा इशारा जामखेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महावितरणला देण्यात आला.

-Ads-

तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन दुष्काळामुळे विस्कळीत झाले आहे. महावितरणने भारनियमन सुरू केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. भारनियमनामुळे हातात आलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत असल्यामुळे सायंकाळी वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी नवरात्र महोत्सवास मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात भारनियमन बंद करावे. ग्रामीण भागात ९ तास भारनियमन चालू केलेले आहे.

दुष्काळात होरपळलेला शेतकऱ्यांना आता भारनियमनाचा फटका बनल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे तत्काळ भारनियमन बंद करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सहाय्यक अभियंता परदेशी यांना देण्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश प्रवक्ते डॉ. कैलास हजारे , युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे , प्रदेश सरचिटणीस मयूर डोके, सामाजिक  न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष लखन मिसाळ, नगरसेवक पवन राळेभात, शहराध्यक्ष अमोल गिरमे, नरेंद्र जाधव , प्रदीप कात्रजकर, प्रसन्न कात्रजकर, गणेश चव्हाण, विठ्ठल कोकाटे , नागेश कात्रजकर, अविनाश शिरसाट, केशव सातपुते, गोविंद राउत, काकासाहेब कोल्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
128 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)